राधा....

यमुना तीरी आली राधा 

तिचा काय रे कसुर 

बोलावतो पुन्हा तिला 

तुझ्या बासुरीचा सूर 


कसे सांगावे सावळ्या 

मन कसे अडकते 

राधा तुझ्याच अंतरी 

सांग कशी सामावते 


प्रेम म्हणू तरी कसे 

जे ना कधी गोंजारिले 

सावळ्याची झाली राधा 

तरी श्वास अंतरिले 

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

गाठ भावनानां पडली