Waiting...

 तुज्या असण्याचे असले 

भास जरी मज पाशी 

चांदण्यात प्रीतीच्या जपते 

तुज्या आठवणींच्या राशी 


सांग तुझा सहवास कसा 

लाभावा या जीवाला 

आस दाटते डोळ्यात 

काहूर माजे मनाशी 


जपेन मी सारे कायम 

तुज्याच साठी सख्या रे

राधा पाहते कृष्णाची 

वाट पाहेन  मी तशी 

 

शब्दांचा खेळ हा 

मांडला कविते साठी 

भावना तरीही माझ्या 

राहिल्या माझ्याच पाशी 

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

Kay Bolav Hyanchypude...