Posts

Showing posts from February, 2016

गोळाबेरीज

आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती दुष्काळात पाण्यासाठी झुरत होती वादळात स्थिरते साठी घुमत होती कधी उपाशी राहत होती कधी निर्वस्त्र फिरत होती तरीही या संसारात जगात होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती कधी झाला अन्याय तिच्यावर कधी झाला अत्याचार तिच्यावर कधी झाला बलात्कार तीच्यवर या सगळ्याच्या प्रतीशोधासाठी झुरत होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती कधी पवित्रतेचा आरसा सीता बनली कधी शिवाजींची आई जिजाऊ बनली तर कधी चान्दिकाही बनली ती अजून दुसरी तिसरी कोणीही नसून तुमच्या आमच्या सारखी सामान्य जनता होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती