गाठ भावनानां पडली

भाव नात्याचे फीके
पडले कसे सदाचे
क्षणीक अबोला गेला
वय वाढले तयाचे

बंध रेशमाचे नाजूक
गाठीनी कसे जोडावे
श्वास गुतंवून त्यात
प्राण तरी कसे सोडावे

सर्वस्व वाहूनी प्रेमात
अजून काय करावे अर्पण
मी मात्र म्हणे मीच
मग कसे व्हावे समर्पण

वागणे बोलणे असे
समजूनी कसे उमजावे
गाठ भावनानां पडली
ते कसे सोडवावे..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची