नवीन भेट

तुझा स्पर्श ओळखीचा
आज भासे अनोळखी

रोजचाच तु परी

वागणे अनोळखी

सारे जुनेच माझ्या पाशी

तु मात्र आज नव्याने भेटसी


बोलक्या रूपात तुझ्या

हरवले शब्द माझे

सांगावयाचे आहे 

आणखी काय तुझे

भाव तुझ्या मनीचे

तरी पोहचले मजपाशी


कळून चुकले माझे मला

माझ्या मना सम वागणे तुझे

क्षणीक होते भास सारे

विरती दिवसात काजवे जसे

 मैत्री  प्रेम तुझे

उरले शुन्य मजपाशी


  • प्रिती नारायण रश्मी सागवेकर

Comments

Popular posts from this blog

एक खिडकी स्वतःची