Posts

Showing posts from May, 2021

अजूनही....

आठवूनी त्या क्षणांना  श्वास हा अडखळतो अजूनही  तुझ्याच अंगणी  घुटमळतो  सुवास मोगऱ्याचा अजूनही  तीच  रात्र चांदण्याची  बहरून येते अजूनही  पण चंद्र आता  कुठे  मन हे वेडे शोधते अजूनही  नजरेत माझ्या साठवलेले  तुझे रूप सजते अजूनही  शृंगाराने तुज्या आजही   मोहते मन अजूनही  काय सांगू  तुला  दैना  होते या  जीवाची अजूनही  तू ये सखे परतुनी  श्वास हे बोलावती  तुला अजूनही 

LOVE AT FIRST SITE....

मोरपीस हे प्रेमाचे मलाही स्पर्शून गेले  मनात त्याच्या माझे मन गुतंवून गेले नजरेत अडकवूनी नजर डोळे बोलून गेले गाफील राहीलो दोघे,जे व्हायचे होवून गेले लूटमार ती ह्रुदयाची नकळत होउन गेली कोण काय बोलले, कोण ऐकुन गेले मूक्या भावनां मध्ये काळीज गुतंवून गेले वेळ जरा ती चुकली, बोलणे राहून गेले तु भेट पुन्हा सखे, डोळे सांगुन गेले व्यवहार हा प्रेमाचा जे न दीले घेतले भेटून पुन्हा ठरवू, काय बाकी राहीले स्वप्न माझे हात तुझा हाती माझ्या देउन गेले....