Posts

Showing posts from 2016

प्रेम का करायचं असत..

काय विचारता राव.. !!!   म्हणे प्रेम का करायचं असत..   हा काय प्रश्न झाला का.. शेम्ड पोरग बी सांगाल..  प्रेम का करायचा असतं..   कारण माणसाला जगायचं असत   श्वास घेता घेता तिच्या प्रेमात रोज मरायचं असत   रोज फक्त बघायचं नसत..   कधीतरी तिच्यासोबत हसायचं असत   अजूनही विचारता प्रेम का करायचं असत..   सतत कामात डुबायचं नसत   कधीतरी तिला चोरून बघायचं असत   तिच्या सौंदर्याला निहाळायचं असत   कारण दाखवत नसली तरी तिलाही हे सगळं आवडत असत..  अजूनही विचारता प्रेम का करायचं असत..   आपलंस वाटणार कुणीतरी माणसाला हवाच असत   कधीतरी मन चोरीला जाणारच असत...  जाऊद्या कि मग..   नजरेला नजर भिडणारच असते   मनाशी मन जूळणारच असते..   आपण फक्त प्रेम जगायचं असत..  अजूनही विचारता प्रेम का करायचं असत..  चांदण्या रात्री कोणाला तरी भेटायचं असत..   हातात हात धरून चालायचं असत   एकांताचा आस्वाद प्रेमाला द्यायचा असतो   प्रीतीचा चांदणं मनात साठवायचं असत...   आता तरी विचारू नका... प्रेम का करायचं असत..

का ?

खरंच संताप येतो कधी कधी... किती किळस वाण वाटत ऐकल्यावर... मुळात ते ऐकावं लागत तेव्हा स्वतःचीच लाज वाटते... मासिक पाली मुळे कधी स्त्री असल्याचा कंटाळा नाही आला.. पण हे अस काही ऐकल्यावर येतो.. पण जेव्हा अस काहीतरी कानावर पडत तेव्हा खरंच तळपायाची शीर अगदी मस्तकात पोहचते म्हणतात ना तस होत.. रोज कुठून ना कुठून तरी ऐकू येतातच ते शब्द.. आज काल तर मुली सुद्धा सर्रास स्वतःच्या तोंडून असं काही तरी बोलतात.. बोलावत तरी कसा यांना मला समजत नाही.. पुरुषांचं मी समजू शकते पण मुली बायका.. कस शक्य आहे.. खरंच हे थांबायला हवं.. का इतक्या घाणेरड्या शिव्यांचा वापर सर्रास केला जातो बोलण्यात... कोणी हक्क दिला याना स्त्रियांच्या शरीराच्या भागांचा वापर शिव्या म्हणून करण्याचा.. माज्या समजण्यात काही चूक झाली असेल तर मला सांगा पण जेव्हड मला समजत तेवढ बघता मला तरी हे चुकीचं वाटत.. ज्या अवयया मुळे जगातलं सगळ्यात सुंदर सुख एक माणूस म्हणून माणसाला उपभोगता येत त्या गोष्टींचा वापर त्याच माणसाला शिव्या घालण्यासाठी किव्वा मी म्हणेन सर्वात  नीच म्हणून दर्शवण्यासाठी केला जातो.. का... ? मी ते शब्द लिहू

गोळाबेरीज

आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती दुष्काळात पाण्यासाठी झुरत होती वादळात स्थिरते साठी घुमत होती कधी उपाशी राहत होती कधी निर्वस्त्र फिरत होती तरीही या संसारात जगात होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती कधी झाला अन्याय तिच्यावर कधी झाला अत्याचार तिच्यावर कधी झाला बलात्कार तीच्यवर या सगळ्याच्या प्रतीशोधासाठी झुरत होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती कधी पवित्रतेचा आरसा सीता बनली कधी शिवाजींची आई जिजाऊ बनली तर कधी चान्दिकाही बनली ती अजून दुसरी तिसरी कोणीही नसून तुमच्या आमच्या सारखी सामान्य जनता होती आयुष्याची गोळाबेरीज करताना जगाच्या पाठीवर एक सोंगटी फिरत होती