Posts

Showing posts from 2020

गाठ भावनानां पडली

भाव   नात्याचे   फीके पडले   कसे   सदाचे क्षणीक   अबोला   गेला वय   वाढले   तयाचे बंध   रेशमाचे   नाजूक गाठीनी   कसे   जोडावे श्वास   गुतंवून   त्यात प्राण   तरी   कसे   सोडावे सर्वस्व   वाहूनी   प्रेमात अजून   काय   करावे   अर्पण मी   मात्र   म्हणे   मीच मग   कसे   व्हावे   समर्पण वागणे   बोलणे  अ से समजूनी   कसे   उमजावे गाठ   भावनानां   पडली ते   कसे   सोडवावे ..

एक खिडकी स्वतःची

एक खिडकी स्वतःची मनाच्या काळोखात कवडसा देणारी निराशेचे च्या समुद्रात आशेची नाव तरणारी माझ्या अधुऱ्या स्वप्नाची एक खिडकी स्वतःची हळूच डोकावते मन पाहते डोळे भरून इच्छांची रंगीत फुले माझ्या विचारांवर डुले स्वर्ग सुखाला साजेशी एक खिडकी स्वतःची... धुंद होऊनि मिटावे डोळे झोकून द्यावे मना धावत सुटावे ध्येया विना कधी तरी पाहावे जग आपल्या नजरेतुनी मनाजोगे दाखवणारी एक खिडकी स्वतःची... सुखाची मंद झुळूक ओढून नेते दूर वर काय त्या पलीकडे जाणून घ्यावे सत्वर कल्पनेच्या बाहेर ते अस्तित्व आले समोरी तुटली स्वप्ने काचेची एक खिडकी स्वतःची... - प्रिती नारायण सागवेकर