Posts

Showing posts from February, 2022

राधा....

यमुना तीरी आली राधा  तिचा काय रे कसुर  बोलावतो पुन्हा तिला  तुझ्या बासुरीचा सूर  कसे सांगावे सावळ्या  मन कसे अडकते  राधा तुझ्याच अंतरी  सांग कशी सामावते  प्रेम म्हणू तरी कसे  जे ना कधी गोंजारिले  सावळ्याची झाली राधा  तरी श्वास अंतरिले 

Waiting...

 तुज्या असण्याचे असले  भास जरी मज पाशी  चांदण्यात प्रीतीच्या जपते  तुज्या आठवणींच्या राशी  सांग तुझा सहवास कसा  लाभावा या जीवाला  आस दाटते डोळ्यात  काहूर माजे मनाशी  जपेन मी सारे कायम  तुज्याच साठी सख्या रे राधा पाहते कृष्णाची  वाट पाहेन  मी तशी    शब्दांचा खेळ हा  मांडला कविते साठी  भावना तरीही माझ्या  राहिल्या माझ्याच पाशी