Posts

राधा....

यमुना तीरी आली राधा  तिचा काय रे कसुर  बोलावतो पुन्हा तिला  तुझ्या बासुरीचा सूर  कसे सांगावे सावळ्या  मन कसे अडकते  राधा तुझ्याच अंतरी  सांग कशी सामावते  प्रेम म्हणू तरी कसे  जे ना कधी गोंजारिले  सावळ्याची झाली राधा  तरी श्वास अंतरिले 

Waiting...

 तुज्या असण्याचे असले  भास जरी मज पाशी  चांदण्यात प्रीतीच्या जपते  तुज्या आठवणींच्या राशी  सांग तुझा सहवास कसा  लाभावा या जीवाला  आस दाटते डोळ्यात  काहूर माजे मनाशी  जपेन मी सारे कायम  तुज्याच साठी सख्या रे राधा पाहते कृष्णाची  वाट पाहेन  मी तशी    शब्दांचा खेळ हा  मांडला कविते साठी  भावना तरीही माझ्या  राहिल्या माझ्याच पाशी 

मन

मन   अस्थीर   अस्थीर दू : ख   वाहते   भरून कशी   भरू   मी   ओजंळ सु : ख   धावते   सांडुन   मन   उदास   उदास काय   करू   रे   तयाचे थांग   पत्ता   ना   कशाचा समजवावे   तरी   कसे मनी   काहुर   माजतो शोधी   दिशा   दाहि दाह   उठतो   का   उरी शांती   मिळेना   कोठेही Priti Narayan Rashmi Sagavekar 

राखी म्हणजे..

विचार केला तर  बरंच काही असते  नाहीतर फक्त  सूत रेशम सजते  भावाच्या हाथावर  शोभून  दिसते  एका अल्हड नात्याची  साक्षीदार बनते  जगावेगळं प्रेम जपते  कधी रडवून हसवते  कधी हसवून रडवते  प्रेमाने बांधून ठेवते  राखी म्हणजे अजून  काही नाही तस  पण भावाबहिणीच्या  प्रेमळ नात्याची जाणीव असते  - Priti Narayan Rashmi Sagavekar
आठवानीं तुझीया रात्र ती जागवली तेव्हा स्वप्न ते पहाटेचे  तुला ही का पडले होते माझ्या मनीचा ठाव जाहला परका जणु माझ्याच साठी तुझ्याही मनी आसवांचे टाहो कधी का फूटले होते डोळ्यात माझ्या स्वप्नांचे मिनार मी तोडले तेव्हा जाणीवां तुझ्या ही मनीच्या संपल्या, मी पाहिले होते… -  प्रिती नारायण रश्मी सागवेकर 

Nothing but something 🙂❤️

  दाटुनी   येती   नयन आठव   येता   तूझी का   रे   अबोला   असा धरलास   माझ्याशी नाही   क्षणाची   ही ज्ञात   असूनी   मनाशी परतूनी   गेले   पाणी भेटुनी   किनाऱ्याशी दिलेस   तेव्हा   तू सुख   मनाला   ह्या तेवढीच   साठव ठेवेन   मी   मनाशी निष्कारण   माझे   हे मन   अस्वस्थ   होते निर्भिस्त   तूझा   तू वाटा   नव्या   शोधीशी PRNS

नवीन भेट

तुझा   स्पर्श   ओळखीचा आज   भासे   अनोळखी रोजचाच   तु   परी वागणे   अनोळखी सारे   जुनेच   माझ्या   पाशी तु   मात्र   आज   नव्याने   भेटसी बोलक्या   रूपात   तुझ्या हरवले   शब्द   माझे सांगावयाचे   आहे   आणखी   काय   तुझे भाव   तुझ्या   मनीचे तरी   पोहचले   मजपाशी कळून   चुकले   माझे   मला माझ्या   मना   सम   वागणे   तुझे क्षणीक   होते   भास   सारे विरती   दिवसात   काजवे   जसे न   मैत्री   न   प्रेम   तुझे उरले  शुन्य   मजपाशी प्रिती   नारायण   रश्मी   सागवेकर