Posts

Showing posts from August, 2021

राखी म्हणजे..

विचार केला तर  बरंच काही असते  नाहीतर फक्त  सूत रेशम सजते  भावाच्या हाथावर  शोभून  दिसते  एका अल्हड नात्याची  साक्षीदार बनते  जगावेगळं प्रेम जपते  कधी रडवून हसवते  कधी हसवून रडवते  प्रेमाने बांधून ठेवते  राखी म्हणजे अजून  काही नाही तस  पण भावाबहिणीच्या  प्रेमळ नात्याची जाणीव असते  - Priti Narayan Rashmi Sagavekar
आठवानीं तुझीया रात्र ती जागवली तेव्हा स्वप्न ते पहाटेचे  तुला ही का पडले होते माझ्या मनीचा ठाव जाहला परका जणु माझ्याच साठी तुझ्याही मनी आसवांचे टाहो कधी का फूटले होते डोळ्यात माझ्या स्वप्नांचे मिनार मी तोडले तेव्हा जाणीवां तुझ्या ही मनीच्या संपल्या, मी पाहिले होते… -  प्रिती नारायण रश्मी सागवेकर