आठवानीं तुझीया

रात्र ती जागवली तेव्हा

स्वप्न ते पहाटेचे 

तुला ही का पडले होते


माझ्या मनीचा ठाव जाहला

परका जणु माझ्याच साठी

तुझ्याही मनी आसवांचे

टाहो कधी का फूटले होते


डोळ्यात माझ्या स्वप्नांचे

मिनार मी तोडले तेव्हा

जाणीवां तुझ्या ही मनीच्या

संपल्या, मी पाहिले होते…


-  प्रिती नारायण रश्मी सागवेकर 

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची