LOVE AT FIRST SITE....

मोरपीस हे प्रेमाचे मलाही स्पर्शून गेले 

मनात त्याच्या माझे मन गुतंवून गेले

नजरेत अडकवूनी नजर डोळे बोलून गेले

गाफील राहीलो दोघे,जे व्हायचे होवून गेले


लूटमार ती ह्रुदयाची नकळत होउन गेली

कोण काय बोलले, कोण ऐकुन गेले

मूक्या भावनां मध्ये काळीज गुतंवून गेले

वेळ जरा ती चुकली, बोलणे राहून गेले


तु भेट पुन्हा सखे, डोळे सांगुन गेले

व्यवहार हा प्रेमाचा जे न दीले घेतले

भेटून पुन्हा ठरवू, काय बाकी राहीले

स्वप्न माझे हात तुझा हाती माझ्या देउन गेले....

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची