अजूनही....

आठवूनी त्या क्षणांना 

श्वास हा अडखळतो अजूनही 

तुझ्याच अंगणी  घुटमळतो 

सुवास मोगऱ्याचा अजूनही 


तीच  रात्र चांदण्याची 

बहरून येते अजूनही 

पण चंद्र आता  कुठे 

मन हे वेडे शोधते अजूनही 


नजरेत माझ्या साठवलेले 

तुझे रूप सजते अजूनही 

शृंगाराने तुज्या आजही 

 मोहते मन अजूनही 


काय सांगू  तुला  दैना 

होते या  जीवाची अजूनही 

तू ये सखे परतुनी 

श्वास हे बोलावती  तुला अजूनही 

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची