राखी म्हणजे..

विचार केला तर 

बरंच काही असते 

नाहीतर फक्त 

सूत रेशम सजते 


भावाच्या हाथावर 

शोभून  दिसते 

एका अल्हड नात्याची 

साक्षीदार बनते 


जगावेगळं प्रेम जपते 

कधी रडवून हसवते 

कधी हसवून रडवते 

प्रेमाने बांधून ठेवते 


राखी म्हणजे अजून 

काही नाही तस 

पण भावाबहिणीच्या 

प्रेमळ नात्याची जाणीव असते 


- Priti Narayan Rashmi Sagavekar


Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

Kay Bolav Hyanchypude...