मनावरी आपुल्या ह्या
दाटले  का हे धुके
प्रेम आपुले आधीचे
नकळत लपले कुठे

शब्द सारे अंतरले,
शांत  झाली आसवे
आठवणीत राहील ती
सांज सखी तुज्या सवे

गोड हसणे तूझे
श्वास होता माझा सखे
विरहात न्हाहूनी आता
ते ही झाले परके

तुझ्याच मनी विसावले
होते मन माझे
ठाव नाही देहाला या
आता कूठेही सापडे

Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची