लग्न..!!!

कधी थांबणारे हा भावनांचा खेळ..
खरंच गम्मत वाटून घ्यावी कि वाईट वाटून घावे तेच समाजात नाही... आज कालच्या मॅट्रिमोनी साईट्स नि लग्नाचा पुरता खेळचं मांडून ठेवलाय.. हे मान्य कि लोकांना मदत व्हावी हाच हेतू असावा पण खरंच काही फायदा होतोय का कोणाला.. कोणाच्या अपेक्षा किती वाक्य काय म्हणून असतात..
सगळ्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ती करणारे प्रोफाइल खरंच अस्तित्वात तरी असतात का..
म्हणजे आपल्याला जे आवडतात त्यांना आपण आवडत नाहीत.. आणि आपण ज्यांना आवडतो ते आपल्याला आवडत नाहीत.. इन मिन काय निकाल शून्य..
त्यापेक्षा एखाद्याच्या प्रेमात पडलेला काय वाईट आहे मग.. खरंच लग्न म्हणजे अश्या अपेक्षांना साजेसा जोडीदार निवडणे एवढाच असत का..
खरंच त्यामागे काही लॉजिक आहे असा मला तर वाटत नाही.. घरातले मात्र ३-४ वेबसाइट्स वर एकाच वेळी आपल्या मुलांची प्रोफाईल्स ओपन करून ठेवतात.. खरंच कधी कधी तर ते प्रोफाइल खार आहे कि खोटं इथून संशोधनाला सुरुवात करायची असते..
कालचीच गोष्ट कानावर आली.. फार अपेक्षांनी आई वडिलांनी आपल्या मुलीचं प्रोफाइल ओपन केला एका वेबसाइट वर.. एका मुलाने इंटरेस्ट सेंड केला.. तीन स्वीकारली.. दोघं गप्पा मारू लागले.. एकदोनदा भेटणं झाल.. मुलीने आता घरी आई वडील सांगण्याचा निर्णय घेतला.. त्या मुलाला हि तिने त्याच्या घरच्या बद्दल विचारलं.. त्याने विषय टाळला.. मुलीला हळू हळू संशय येऊ लागला..तिने शोध घ्यायचा ठरवलं.. वेगवेगळ्या नावाने त्याच्या घरी फोन केले.. त्याची माहिती काढली..
तेव्हा समजलं कि त्याचा लग्न होऊन एक वर्ष झालंय... तरी सुद्धा हे असा वागणं..
कसबस स्वतःला सावरलं त्या मुलीने.. काहीच वाटत नाही ह्या लोकांना असा वागताना..
हे असा सगळ्यांच्या बाबतीत घडत नसाल तरी आपल्या बाबतीत घडणार नाही याची शाश्वती मिळणं कठीण असत.. मग ह्या वेबसाइट्स वर विश्वास न ठेवलेलेच बर कि स्वतःच नशीब आजमावलेलं बर...
काहीच समाजत नाही..

तस फसवणार कोणी भेटलं नाही तरी जो भेटेल तो कसा असेल ते नाही च नाही माहित..
मुळात आपल्यात हा जो काही लग्नाचा प्रवास असतो.. किव्वा जी काही लग्न ठरवण्याची पद्धत प्रक्रिया आहे तीच कधी कधी पटत नाही.. त्यावर एक म्हण हि प्रचलित आहे म्हणे.. गरीबाची आणावी.. आणि श्रीमंताला द्यावी.. पण का..
अरे ती मुलगी आहे तुमची कि काही तरी वस्तू आहे घरातली.. बऱ्याच ठिकाणी आज हि ह्या प्रथा अस्तित्वात आहेत.. वर वर्ष २५ झाली तरी अजून मुलगी घरातच आहे.. लग्न का जमत नाही हीच.. मुलीलाच काही तरी दोष असणार.. मंगल वैगरे तर नाही न मुलीला.. दहा बाजूनी दहा तोंड बोलू लागतात.. आणि हे सगळं फक्त मुलीच्या आई वडिलांनाच कस काय ऐकू येत देवाला माहित.. पण का.. लोकांना खरंच किती काळजी असते न आपली.. जिथे भेटतील तिथे विचारात असतात..काय मग या वर्षी तरी आहे का कर्तव्य.. जे कर्तव्य करायचं त्यासाठी माझे आई वडील समर्थ आहेत न.. तुम्ही का उगाच काळजी करता.. कधी कधी फार वाईट वाटत.. लोक बोलतात त्याच वाईट नाही वाटत.. लोकांचे बोल ऐकून जेव्हा आपल्या आई वडिलांचा चेहरा टेन्शन मध्ये दिसतो.. त्याच्या चेहर्या वरची लाचारी बघितली कि वाईट वाटत.. वाईट म्हणजे इतकं वाईट कि समजावू नाही शकत.. एक मुलगी लग्न न करता जगूच शकत नाही का.. तिच्या पूर्णत्व साठी लग्न करण इतकं महत्वाच आहे.. आज जगात लग्न न केलेल्या किंवा लग्न केलेल्या अनेक कर्तृत्वान  स्त्रिया अस्तिस्त्वात आहेत ना..
आयुष्य समर्थपणे जगायला लग्न करायलाच हवं का... 

लग्नाला विरोध म्हणून हे सगळं बोलत नाहीये मी.

लग्न हि आयुष्यात खूप महत्वाचं असत हे हि माहितेय पण ते व्हायलाच हवं असा काही नाही..
खूप नाजूक असं बंधन आहे..लग्न.. मुळात लग्न ठरणे ते लग्न होऊन ती मुलगी नवर्याच्या घरी जाई पर्यंतचा सगळा प्रवास त्या मुली साठी किती खास असतो.. आल्हाद दायक असतो हे शब्दात मांडणं सोपं नाही..

स्थळ सांगून येत.. एकमेकांची पसंती होते.. कांदेपोहेंचा कार्यक्रम होतो.. लग्नाची बोलणी होतात.. हे मोठ्यांचं जाल.. या दोघांचं एकमेकांचे नंबर घेऊन फोन वर बोलणं.. गप्पा मरण चालू होतं.. मग काय करतोयस ..जेवलास का.. जेवलीस का.. आवडी निवडी विचारानं.. गुड नाईट.. गुड मॉर्निंग..आणि दोघं एकमेकात गुंतत जातात.. मग साखरपुडा होतो.. हळू हळू लग्नाचा दिवस जवळ येऊ लागतो.. मनाची धड धड वाढते.. रात्रीची झोप  उडते.. तिचं मन विचारानं मध्ये हरवू लागत.. कस असेल माझं नवीन जग.. माझं संसार.. नवीन घरातले नवीन नातलग.. सांभाळून घेतील का मला.. एका रात्रीत हिची संपूर्ण दुनिया इकडची तिकडे होणार असते.. मनाची तयारी तरी किती करावी हिने.. रोज सकाळी उठवायला आई नसणार.. सासू कशी असेल..सासरे कसे असतील..दीर नंदा चांगल्या असतील का. मला स्वीकारतील का.. मला त्यांच्यातलीच एक समजतील का.. प्रश्नचा काहोर माजलेला असतो मनात.. आणि लग्नाचा दिवस जवळ येतो.. हळू हळू त्याच्या रंगात ती रंगू लागते.. त्याच्या नावाची मेहंदी.. त्याची उष्टी हळद लावून लग्न मांडवात येऊन उभी राहते.. मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल ना..

सगळा ठाऊक असत तिला.. उद्या पासून आपलं जग बदलणार.. रोज सकाळी उठल्यावर दिसणारे चेहरे बदलणार.. ऑफिस मधून आल्यावर पाणी चहा विचारणारी आई नसणार.. आपला आपल्यालाच घ्यावं लागणार सगळं.. कपाटातले कपडे हि आपले आपल्यालाच सरळ लावावे लागणार.. ते कसेही ठेवून चालणार नाही ना.. सासरचे काय विचारतील.. काही शिकवलंच नाही कि काय आईने.. किती ते विचार.. काय व्येथा होत असेल ना त्या मुलीच्या मनाची.. खरंच एकदा तरी तो नवरा मुलगा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का.. त्याच काहीच बदलणार नसत..

आजूबाजूचं जग बदललं एवढ्यावरच थांबत नाही राव आपण.. त्यामुलीची ओळख हि एका रात्रीत बदलते.
वडिलांच्या नावा ऐवजी नवऱ्याचं नाव लावावं लागत... आडनाव बदलत... एवढाच नव्हे तर तीच स्वतःच नाव सुद्धा बदलतात..

लग्न दोघांचं होत..पण नाव मुलीचं बदलत.. जग मुलीचं बदलत.. तरीही सासरी तिच्या पदरात सुख पडेलच असा नाही..जे काय असेल तर तिला लग्न नंतरच समजत.. चांगलं असेल ठीक..नाही तर नशीब समजून भोगत रहा आयुष्यभर..

खरंच ग बाई.. खूप धीराची आहेस तू....!!!


Comments

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची