मन...

मला खात्री आहे मनाच्या या प्रकारच्या खेळा मधून प्रत्येक मन जात.. जे नाही जात ते खूप सुदैवी आहेत असा म्हणेन मी..

नक्की काय वाटत आपलं आपल्यालाच काळत नसत.. कोणाची तरी वाट पाहत असत मन.. कोणाची ते नाही माहित... का ते पण नाही माहित..

कदाचित कधी कधी कोणीतरी आपल्या सोबत असावं याही पलीकडील काही भावना असतात.. शांततेतल्या सहवासाच्या... मन बहुदा त्याच शोधात असावं..

कधी पुन्हा थाऱ्यावर येणार मन हे माहित नसताना देखील मनाचा हाथ सोडवत नाही.. काय करायचं काही उमगत नाही..

शेवटी लिहायला बसले.. म्हंटल बघू लिहून तरी काही मिळत का ?

काय करायचं या मनाचं.. फार टेन्शन देत कधी कधी..

नको नको तिथे जाऊन पोहचत ते हि एका क्षणात.. एक प्रसंग घडायची खोटी.. हे चाललं आपलं वाऱ्यासारखा विचाराच्या नदीत वाव्हत... काय गरज असते पण.. का आपल्याला याला वेसण बांधता येत नाही.. का आवरता येत नाही ह्याला.. नाही माहित...

साध्या साध्या प्रसंगात सुद्धा किती विचित्र विचार करत हे.. आपल्याच आपल्या किळस वाटतो.. तरी नशीब मनाला आवाज नसतो.. नाहीतर जगायलाच नको होत कोणाला..

दुसर्याबद्दल वाईट विचार करणारे जगात राहिलेच नसते.. काय माहित कदाचित एकांतात सुद्धा दुसऱ्याचा वाईट विचार करता येतो.. ऐकायला आजूबाजूला कोणी नसेल तेव्हा गुपचूप..

खूप धावत हे .. म्हणूनच कदाचित संगीतकारांनी या मनावर इतकी गाणी बनवली असावीत..

पण कधी कधी वाटत या मानाचं काही ऐकू नये कारण जोपर्यंत आपण विचार करून या मानाचं काही ऐकायला जातो तो पर्यंत संधी गेलेली असते... समोर आलाय तर त्यावर रिऍक्ट होऊन मोकळं व्हावं... पण कदाचित ते चुकीचं हि होऊ शकत.. समोरचा दुखावला तर.. त्याने भलताच अर्थ काढला तर..

हा हि विचार आलाच.. खरंच नाही उमगत कधी कधी.. ज्या माणसांना फटकळ बोलतात त्यांचा प्रकार काहीसा असा असावा कदाचित.. मनाचं लगेच ऐकणारे.. जे मनात आले बोलून मोकळे जाले..

काहींना तस लगेच बोलून जाण नाही जमत... समोरचा चांगला बोलला  तर त्याचा विचार करत बसायचा.. आणि वाईट बोलला कि रडायचं.. हा प्रकार म्हणजे हळवी मानस..

बार काहींना राग आला तरी रडायला येत.. म्हणजे यात नक्की काय समजावं.. असा म्हंटल जात बायकांना हि सवय जास्त असते.. रडणं वैगरे हे सगळं बायकांचाच.. भावना हि स्त्री पुरुष अश्या वेगवेगळ्या वाटून घेतल्यात लोकांनी.. या मुद्द्यात शिरायचं म्हणजे नवीन सुरुवात करावी लागेल तो वेगळाच आहे..

मुसु मुसु रडणं हे काही बायकांचा गुणधर्म आहे असा काही नसत.. ती त्यांची ताकद असते.. तास केल्याने मन हलकं होत.. त्यांना घर सांभाळायचं  असत.. जे घडलाय तेच उराशी बाळगून बसल्या तर बाकीच्यांना पण उपाशी मरावं लागेल...

मला असेही काही पुरुष माहीतेयत जे मुसु मुसु रडतात.. पण एकांतात.. चार चौघात रडले तर त्यांचा पुरुषार्थ कमी होईल कदाचित असा त्यांचा समाज आहे..

लोकांना का समजत नाही.. रडणं..  हसणं..  रागावणं..  वैगरे या सर्व भावना आहेत ज्या प्रत्येक माणसात असतातच.. आणि त्या वेळोवेळी वैक्त्य झाल्याचं पाहिजेत..

भावना मनातच ठेवल्या तर मन सैरभैर होत.. जी मानस वेडी होतात त्यांचं हे पहिला लक्षण असावं.. कदाचित..

आजकाल मानस वक्त्या व्हायलाच घाबरतात.. कोणाही समोर.. मग ते आई वडील असोत भाऊ बहीण असोत.. प्रेयसी प्रियकर असो.. का मग अजून कोणी..

फक्त मन वक्त्य केल्याने किती गोष्टी सुधारता येतील ह्याचा अंदाज सुद्धा कोणी बंधू नाही शकत..
लहान लहान मुलं गुन्हा का करतात.. का शाळा कॉलेज ला जाण्याऱ्या मुलांना आपल्या  आई वडिलांना आपल्या अडचणी सांगता येत नाहीत.. आणि त्याच्या हाथून गेनहे घडतात..

मला माहितेय सगळीच मन चांगले विचार नाही करत.. सगळेच दुसरीच्या भल्याचा विचार नाही करत.. त्यांनी वक्त्य होण्याचा प्रश्नच येत नाही.. कारण त्यांचं मन ते जाणून बुजून करत..

काही मन असतात ज्यांच्या काही गोष्टींचा परिणाम हतो म्हणून ती तास विचार करतात..

म्हणूनच ते गाणं लिहिला गेला असावा मन घडावी संस्कार..

आज काळ हे संस्कार च नाहीसे  झालेत.. आई वडिलांना वेळ नसतो त्यासाठी.. कुठे तरी यासगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा.. ज्या मुलासाठी जीवाचं रान करतात तो काय विचार मनात ठेवून मोठा होतोय हे प्रत्येक आई वडिलांना कळायला हवं..

तितका विश्वासच नातं निर्माण कारण हे आई वडिलांचाच काम असत.. असो.. सर्व जण आपआपल्या परीने हा प्रयत्न करताच असतात हे माहितेय मला.. पण तरीही काहीतरी कुठेतरी राहून जात आणि ताण निर्माण होतो.. मनावर..

हा ताण बाजूला सारायला लोक काही चांगल्या गोष्टी करतात.. आणि काही चुकीच्या गोष्टी करून बसतात.. आणि शिक्षा मनाला होते..

कारण मनाला शिक्षा करणारा कायदा अजून तरी बनला नाहीये..

आपल्याकडे घडलेले गुन्हे सुद्धा अश्या पद्धतीने लोकांना घाबरवून TV वर दाखवले जातात कि लोकांच्या मनात लोकं बद्दलच भीती निर्माण होते.. आणि भीती युक्त मन प्रत्येकाला शंकेने बघत..

 या प्रकारचे कार्यक्रम लोकांना जागृत करतात कि घाबरवतात तेच नाही समाजात..

शेवटी काय तर माणसाचा स्वतःच्या मनावर फार कमी ताबा असतो.. ज्याने तो मिळवला तो संत बनतो.. जो नाही मिळवू शकला तो माणूसच राहतो..

मनाच्या अपेक्षा कधी संपताच नाहीत.. चालूच राहतात

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची