का ?

खरंच संताप येतो कधी कधी... किती किळस वाण वाटत ऐकल्यावर... मुळात ते ऐकावं लागत तेव्हा स्वतःचीच लाज वाटते... मासिक पाली मुळे कधी स्त्री असल्याचा कंटाळा नाही आला.. पण हे अस काही ऐकल्यावर येतो.. पण जेव्हा अस काहीतरी कानावर पडत तेव्हा खरंच तळपायाची शीर अगदी मस्तकात पोहचते म्हणतात ना तस होत.. रोज कुठून ना कुठून तरी ऐकू येतातच ते शब्द.. आज काल तर मुली सुद्धा सर्रास स्वतःच्या तोंडून असं काही तरी बोलतात..
बोलावत तरी कसा यांना मला समजत नाही.. पुरुषांचं मी समजू शकते पण मुली बायका.. कस शक्य आहे.. खरंच हे थांबायला हवं.. का इतक्या घाणेरड्या शिव्यांचा वापर सर्रास केला जातो बोलण्यात... कोणी हक्क दिला याना स्त्रियांच्या शरीराच्या भागांचा वापर शिव्या म्हणून करण्याचा.. माज्या समजण्यात काही चूक झाली असेल तर मला सांगा पण जेव्हड मला समजत तेवढ बघता मला तरी हे चुकीचं वाटत.. ज्या अवयया मुळे जगातलं सगळ्यात सुंदर सुख एक माणूस म्हणून माणसाला उपभोगता येत त्या गोष्टींचा वापर त्याच माणसाला शिव्या घालण्यासाठी किव्वा मी म्हणेन सर्वात  नीच म्हणून दर्शवण्यासाठी केला जातो.. का... ? मी ते शब्द लिहू शकत नाही.. अगदी ते स्टार आणि हॅश वापरून सुद्धा नाही... मला घृणा वाटते त्या शब्दांची.. पण असा कोणीच नाहीये ज्यांना ते माहित नसावेत.. किव्वा हे समजू शकणार नाहीत कि मी कशा बद्दल बोलतेय.. ज्या आईच्या पोटातून आपण जन्म घेतो तिच्या ज्या अवयव द्वारे आपण या जगात येतो त्या गोष्टींचा वापर शिव्या देण्यासाठी करतो म्हणजे काय.. स्वतःच्या जन्माचा अपमान करतोय असा का नाही वाटत बोलणार्यांना... भांडण तुमचं, वाद तुमचा मग भर चौकात स्वतःच्या आय बहिणींना का नागडं करता..  आजकाल लहान सहन मुलं सुद्धा हमखास बोलायला लागतात हे असाल काहीतरी... खरंच विचार बदलण्याची गरज आहे.. कधी समजणार लोकांना.. आता तरी थांबवा...

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नवीन भेट

एक खिडकी स्वतःची