एकादशी

 मन धावे दाही दिशा 

शांती नाही या जीवा

तुज्या नावात शोधतो

विठू राया मी विसावा


आयुश्याचि हि ​​माझ्या

ऐशी कशी रे वणवण 

तुज्या पायी मिलो ठाव

हिच एकली जाणिव


मला नाही रे जमायचे

संत करुनि जे गेले

संसाराची रे माझ्या

मनीं माझ्या गुंतवण 


तुझे नाम मुखी येवो 

तुझे रुप मनी राहो

माझा पांडुरंग माझ्या 

सदा सोबत राहो

-PNRS

Comments

Popular posts from this blog

एक खिडकी स्वतःची

Valentine day.. ❤️🌹

गाठ भावनानां पडली